ICHMH51NEWS.IN
9921600800

“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानात डी के ए एस सी महाविद्यालयाच्या एन सी सी कॅडेटसचा सहभाग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानात डी के ए एस सी महाविद्यालयाच्या एन सी सी कॅडेटसचा सहभाग

इचलकरंजी :
 डी के ए एस सी महाविद्यालय व आय जी एम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयजीएम रुग्णालयामध्ये “स्वस्थ नारी,सशक्त परिवार” या शासकीय अभियानाअंतर्गत विविध उपक्रम घेतले गेले. यामध्ये प्रामुख्याने रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांचे त्याचप्रमाणे आरोग्य संदर्भातील तपासणीसाठी आलेल्या नागरिकांचे आ भा कार्ड रजिस्ट्रेशन करण्याचे काम डी के ए एस सी महाविद्यालयातील एनसीसी विभागातील कॅडेटनी अत्यंत उत्स्फूर्तपणे या उपक्रमांतर्गत केले. या उपक्रमामध्ये  एकूण  ४००  नागरिकांचे  आ भा कार्ड रजिस्ट्रेशन एन सी सी कॅडेटनी मोफत करून दिले.
या वेळी रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ, डॉ. अमित सोहनी, डॉ.  प्रकाश मोरे उपस्थित होते.डी के ए एस सी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सी विभाग प्रमुख प्रा. लेफ्ट. विनायक भोई  व एन सी सी कॅडेट या उपक्रमात सहभागी झाले.
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आभा कार्ड नोंदणी वेळी उपस्थित कॅडेट व रुग्णालय अधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा