ICHMH51NEWS.IN
9921600800

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक ‘सर्वोत्कृष्ठ बँक’ व ‘बेस्ट सायबर सिक्युरीटी ट्रान्सफॉर्मेशन’ पुरस्काराने सन्मानीत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक ‘सर्वोत्कृष्ठ बँक’ व ‘बेस्ट सायबर सिक्युरीटी ट्रान्सफॉर्मेशन’ पुरस्काराने सन्मानीत

इचलकरंजी:
 ता. बँकींग फ्रंटीवर्स, मुंबई यांचेकडून महाराष्ट्रामध्ये सक्षमपणे व यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या बँकांसाठी दरवर्षी अनेकविध पुरस्कार प्रदान केले जातात. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी बँकींग क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकस ‘सर्वोत्कृष्ठ बँकेचा’ बँकेच्या ग्राहकांचे पैसे व आर्थिक व्यवहार सुरक्षित रहावेत यासाठी बँकेने उत्कृष्ठ सायबर सिक्युरीटीचा अवलंब केला आहे त्यासाठी ‘बेस्ट सायबर सिक्युरीटी ट्रान्सफॉर्मेशन’ पुरस्कार देवून सन्मानीत करणेत आले. सदरचा पुरस्कार, गोवा येथे भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री सतीशजी मराठे व राष्ट्रीय नागरी सह. वित्त विकास महामंडळ (NUCFDC) मुंबई वा महामंडळाचे अध्यक्ष श्री ज्योतिंद्रभाई मेहता व गोवा राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री सुभाष शिरोडकर यांचे शुभ हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत बँकेचे चेअरमन मा. श्री स्वप्निल आंवाडे यांना स्विकारला.
सदरच्या यशाबद्दल प्रतिपादन करताना बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे म्हणाले, ग्राहकांचा विश्वास आणि सहकाऱ्यांचे परिश्रम यामुळेच ही मोठी कामगिरी यशस्वीपणे पार पाडणे शक्य झाले आहे. येथून पुढील काळातही सहकाराच्या बळावर डिजीटलायझेशन आणि सुरक्षित बँकींग सुविधा देत आम्ही नवनवीन शिखरे पादाक्रांत करत राहू असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रीयकृत व खाजगी बँका ज्या अत्याधुनिक सोई सुविधा देत आहेत त्या सुविधा देण्यासाठी बैंक नेहमीच कटिबध्द आहे. १९६३ साली स्थापन झालेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने, संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये ५४ शाखांच्या माध्यमातून शाखा विस्तार करून, जनसामान्यांच्या आर्थिक हितास कटिबध्द राहून, जनमानसात बैंक लोकाभिमुख झाली व सहकारी बँकींग क्षेत्रात एक आदर्श बैंक म्हणूल नावारूपास आली आहे. याचेच प्रतिक म्हणून आज बँकेस सहकारी बँकींग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून गौरविण्यात आले आहे असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी या प्रसंगी केले.
तसेच बँकींग व्यवहार करत असताना सध्या अनेक समस्यांना, धोक्यांना व घोटाळयांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, बँक व बँकेच्या ग्राहकांना खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व धोक्यांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी बँकेने सायबर सिक्युरीटीचा अवलंब करत. बँक ग्राहकांच्या बँकींग व्यवहारांचे संरक्षण करण्यास नेहमीच कटिबध्द आहे व त्यामुळेच बँकेवर किंवा बँकेच्या ग्राहकांना आजअखेर कोणत्याही आर्थिक धोक्यास सामोरे जावे लागले नाही याचा सार्थ अभिमान असल्याचा निर्वाळा चेअरमन यांनी सदर प्रसंगी केला. याचेच प्रतिक म्हणजे बँकींग फ्रंटीवर्स यांनी ‘बेस्ट सायबर सिक्युरीटी ट्रान्सफॉर्मेशन’ पुरस्कार देवून सन्मानीत केले असल्याचे गौरवोद्‌गार काढले.
सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य बँक्स् फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ. वैशाली आवाडे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे चेअरमन सीए श्री चंद्रकांत चौगुले, संचालक सर्वश्री बाबूराव पाटील, बंडोपंत लाड, श्रीशैल कितुरे, शैलेश गोरे, अविनाश कांबळे, राजू चव्हाण, सचिन देवरुखकर, योगेश पाटील, रमेश पाटील, सारंण जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय शिरगावे, जनरल मॅनेजर श्री किरण पाटील यांच्यासह इतर मान्यवर व देशातून विविध बँकांचे पदाधिकारी व अधिकारी सदर पुरस्कार सोहळयास मोठया संख्येने उपस्थित होते

पुरस्कार स्वीकारताना चेअरमन स्वप्निल आवाडे,वैशाली आवाडे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा