ICHMH51NEWS.IN
9921600800

डिकेएएससी च्या खेळाडूंची शिवाजी विद्यापीठ योगासन संघात निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डिकेएएससी च्या खेळाडूंची शिवाजी विद्यापीठ योगासन संघात निवड

वार्ता – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डीकेएएससी कॉलेज, इचलकरंजी च्या खेळाडूंची चेन्नई येथे होणाऱ्या वेस्ट झोन इन्टर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
डॉ.घाळी कॉलेज, गडहिंग्लज येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय योगासन स्पर्धेत सन्मती सगरे व ऐश्वर्या पाटील यांनी ट्रॉडीशनल टिम या प्रकारात पाचवा आणि सहावा क्रमांक पटकावला तर सौरभ पाटील याने ट्राडीशनल वयक्तिक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून शिवाजी विद्यापीठ संघात स्थान निश्चित केले व चेन्नई येथे होणाऱ्या वेस्ट झोन इन्टर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात त्यांची निवड झाली.
Advt
या खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांचे प्रोत्साहन लाभले. महाविद्यालयाचे प्रबंधक श्री आर. बी. जोग तसेच वरीष्ठ लिपीक श्री. सुनिल अपराध यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मुजफ्फर लगीवाले व प्रा. विनायक भोई यांचे मार्गदर्शन लाभले.  या खेळाडूंचे सर्वत्र कौतूक होत आहे.
योगासन संघात निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देताना प्राचार्य एस.के.खाडे व शिक्षक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा