‘दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास मध्यवर्ती युवा महोत्सवात घवघवीत यश’
इचलकरंजी:
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत दि. १८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथे ४५वा मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. एकूण १७८ महाविद्यालयांनी सदर महोत्सवात सहभाग नोंदवला. यात दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास घवघवीत यश प्राप्त झाले आहे. दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी सदर महोत्सवाची सांगता झाली. सदर समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू प्रो. (डॉ.) डी. टी. शिर्के तर अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे होते. त्यांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने सदर ४५वा जिल्हास्तरीय व मध्यवर्ती युवा महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. महाविद्यालयाने कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव माहितीपर कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) शंकर खाडे यांचा विशेष सत्कार मा. कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ ४५ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सव शिवराज महाविदयालय गडहिंग्लज येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत लोकनृत्य : तृतीय ,मूकनाट्य : चौथा ,एकपात्री : पाचवा याप्रमाणे यश संपादन झाले .
Advt
तर मध्यवर्ती युवामहोत्सवात महाविद्यालयास एकूण ११ बक्षिसे प्राप्त झाली. त्यात मुकनाट्य प्रथम, शोभायात्रा प्रथम, कातरकाम द्वितीय, शास्त्रीय तालवाद्य द्वितीय, शास्त्रीय सूरवाद्य तृतीय, पाश्चिमात्य समूह गीत तृतीय, एकपात्री अभिनय चौथा, शास्त्रीय नृत्य चौथा, मातीकाम चौथा, पाश्चिमात्य एकल गायन पाचवा, लोकनृत्य पाचवा अशा विविध कला प्रकारातील यशांचा समावेश आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूर्वतयारीने उतरून आपल्या कला मोठ्या उत्साहात सादर केल्या. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची प्रेरणा, महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे आशीर्वाद, सांस्कृतिक विभागातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द व मेहनत यामुळे महाविद्यालयाला हे यश संपादन करण्यात मदत झाली.
महाविद्यालयास मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल विविध स्तरांतून महाविद्यालयाचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. अभयकुमारजी साळुंखे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) शंकर खाडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार महाविद्यालय स्तरावर घेऊन त्यांच्या यशाचे कौतुक केले व महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ. पद्मश्री वाघमारे तसेच डॉ. अशोक बोगुलवार, प्रा. दिगंबर नागर्थवार, डॉ. रितू रॉड्रिक्स यांचेही विशेष अभिनंदन केले .. या यशामुळे महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.
युवा महोत्सवातील विजेते विद्यार्थी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







