महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी सर्वांगीण वाचन करून समृद्ध व्हावे – प्रा. प्रकाश काशीद
महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाचे उद्घाटन व ६१ व्या ‘विवेक’ वार्षिक नियतकालिकाचा प्रकाशन समारंभ संपन्न…
इचलकरंजी :
दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी येथे महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या ६१ व्या ‘विवेक’ वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे जयंती वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. या समारंभाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक व एकपात्री कलावंत प्रा. प्रकाश काशीद यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थान प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे यांनी भूषविले.
आपल्या मनोगतात बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. प्रकाश काशीद म्हणाले, “महाविद्यालयीन जीवन हेच वाचनाने समृद्ध होण्याचे वय आहे. या काळात विद्यार्थ्यांनी चौफेर वाचन करून सर्जनशील लेखनही केले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या लिहिण्या-वाचण्याला चालना मिळावी हा महाविद्यालयातील वाङ्मय मंडळ आणि वार्षिक नियतकालिकांचा प्रमुख हेतू आहे. आपल्यातूनच येत्या काळात चांगले साहित्यिक घडावेत.” अशा आशयाचे मनोगत व्यक्त करून त्यांनी आपल्या प्रचंड विनोदी एकपात्री अभिनयाच्या नाट्यछटा सादर करत उपस्थित प्रेक्षकांना खळखळून हसवले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे म्हणाले, “महाविद्यालयातील वाङ्मय मंडळ आणि ‘विवेक’ वार्षिक नियतकालिकाची मोठी परंपरा आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच ते एक जबाबदार व समृद्ध माणूस म्हणून घडावे, तसेच शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना अपेक्षित ज्ञान, विज्ञान व सुसंस्कारांनी संपन्न विद्यार्थी तयार व्हावेत, यासाठी वाङ्मय मंडळ हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरते.” यावेळी ‘विवेक’चे संपादक प्रो. डॉ. सुभाष जाधव व सहसंपादक डॉ. प्रभा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. समारंभात संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे जयंती वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा तसेच ‘विवेक’ नियतकालिकाच्या संपादक मंडळाचा गौरव करण्यात आला.
Advt
दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व संस्थाप्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय वाङ्मय मंडळाचे सचिव प्रा. रोहित शिंगे यांनी केला. या प्रसंगी प्रा. डी. ए. यादव, प्रा. व्ही. पी. पाटील, प्रबंधक श्री. आर. बी. जोग, ग्रंथपाल प्रा. प्रतिभा पाचंगे, प्रा. बाळासाहेब चावरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. अपर्णा कांबळे, प्रा. प्रथमेश गवळी, प्रा. संदीप पाटील, डॉ. रिता रॉड्रीक्स, प्रा. पद्मा पाटील, प्रा. स्नेहल लिंग्रस तसेच वाङ्मय मंडळ सदस्य, ग्रंथालय विभाग आणि बुक लव्हर्स ग्रुप यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंजली उबाळे यांनी केले, तर आभार प्रा. अर्चना नंदगावे यांनी मानले. यावेळी गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेक अंकाचे प्रकाशन करताना प्रा.प्रकाश काशीद, प्रा.एस.के.खाडे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







