ICHMH51NEWS.IN
9921600800

संविधान परिवारातर्फे गांधी जयंती अभिवादन आणि सीमोल्लंघन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संविधान परिवारातर्फे गांधी जयंती अभिवादन आणि सीमोल्लंघन

इचलकरंजी:
 संविधान परिवार आणि सद्भाव मंच महाराष्ट्रवतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी संविधानिक मुल्ये आणि एकात्मतेचा विचार रुजवणारे पोस्टर हातात धरुन संदेश देण्याचा प्रयत्न केला.
प्रशांत देशपांडे सरांनी सस्नेह पाठवलेले साधना युवा दिवाळी अंक या युवकांना देण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा दल इचलकरंजीचे जिल्हा अध्यक्ष अनिल होगाडे, संघटक रोहित दळवी, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा समन्वयक अशोक वरुटे, संवेदना फेलोशिप, डॉ बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थाचे सहकारी आवर्जून उपस्थित होते. याचे सूत्र संयोजन जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर यांनी केले.
संविधान परिवार आणि सद्भाव मंच द्वारे संविधानिक मूल्य आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा