इमनपा तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
इचलकरंजी (२ ऑक्टोबर) :
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज विनम्र अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी चौक येथील गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच गांधी उद्यानातील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. याशिवाय महापालिका सभागृहातील माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेलाही अभिवादन करण्यात आले.
Advt
या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सहायक आयुक्त विजय राजापुरे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख सुनिल शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, उद्यान पर्यवेक्षक शितल पाटील, सुनिल बेलेकर, क्रीडा अधिकारी संजय शेटे, भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, संदीप जोशी, सदाशिव जाधव, प्रदीप झमरी आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








