इचलकरंजीत ‘स्वच्छता जनजागृती दौड’ उत्साहात
इचलकरंजी (२ ऑक्टोबर) :
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छता हिच सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता जनजागृती दौड उत्साहात संपन्न झाली.
शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत शहरात स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. या काळात एक दिवस, एक साथ, एक तास महास्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलन मोहिम यांसारखे विविध उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमाचा समारोप स्वच्छता जनजागृती दौडद्वारे करण्यात आला.
छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते दौडेला सुरुवात झाली. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, सहा. आयुक्त विजय राजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ही दौड शाहू महाराज पुतळा – श्री शिवतीर्थ – कॉ. के.एल. मलाबादे चौक ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर पार पडली. महात्मा गांधी पुतळा येथे स्वच्छतेची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Advt
या वेळी स्वच्छता दूत गजानन महाजन गुरुजी, मुख्याध्यापक शंकर पोवार, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख सुनिल शिंदे, सहा. आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर, स्वच्छ सर्वेक्षण नोडल अधिकारी उमेश कांबळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, महिला व बालकल्याण अधिकारी बेबी नदाफ, भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ, उद्यान पर्यवेक्षक शितल पाटील यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
स्वच्छता दौडदरम्यान शपथ घेताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे,गजानन महाजन गुरुजी व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







