तारदाळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, नऊ जणांना अटक
इचलकरंजी
उपविभागीय पोलीस ठाण्याच्या पथकाने तारदाळ नाका परिसरात मोठी कारवाई करत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून नऊ जणांना अटक केली.शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी एकूण २,१७,१५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये १४,१५०/- रोख रक्कम, ४३,०००/- किंमतीचे ७ मोबाईल हॅन्डसेट आणि १,६०,०००/- किंमतीच्या ३ मोटरसायकलींचा समावेश आहे.
यावेळी आकाश राजेश मलके (रा. खोतमळा, तारदाळ), विनायक शिवाजी तोडकर (रा. जयभीमनगर, इचलकरंजी), सलीम सिकंदर मुलाण्णी (रा. भारत माता हौसिंग सो.सा., इचलकरंजी), काशिम शिराज अरब (रा. दत्तनगर गल्ली नं.१०, शहापूर), हुसेन लतीफ शेख (रा. पाण्याची टाकी जवळ, शहापूर), करण शाम मछले (रा. मोहीते नगर, कोल्हापूर), अविनाश मनोहर कुला (रा. सांगली रोड, इचलकरंजी), सैफान सलीम शेख (रा. सागवानबाग, तारदाळ) आणि रमजान मुर्तजा मुल्ला (रा. आझादनगर, तारदाळ) हे तारदाळ रोडवरील आकाश मलके यांच्या राहत्या घरात तीन पत्तीचा जुगार खेळत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. फिर्यादी विजय शामराव मगदूम यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत उपविभागीय पोलीस ठाण्याचे सुनील पाटील यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत. या छाप्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







