बी.एस.एन.एल. कार्यालयात कॉपर पट्ट्या चोरण्याचा प्रयत्न, आरोपी रंगेहात पकडला
इचलकरंजी – बी.एस.एन.एल. कार्यालयाच्या जनरेटर रुममध्ये कॉपर अर्थिंग पट्ट्या चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमित वसंत माळी (वय ४०, रा. गोसावी गल्ली) याला पोलिसांनी रंगेहात पकडले. फिर्यादी मनोजकुमार आवळे (उपमंडल अधिकारी, बी.एस.एन.एल.) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटना ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १.१५ वाजता घडली. सहा. फौजदार कसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.पुढील तपास सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







