तीनपाणी जुगार अड्ड्यावर छापा, ८ जण अटकेत
इचलकरंजी:
शिवाजीनगर पोलिसांनी किसान चौक येथील एका इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ८ जणांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये आतिश माळी, संजय शिंदे, राहुल माळी, आकाश जाधव, अजित जाधव, अरमान मोमीन, राजेंद्र भिसे व राजेश जाधव यांचा समावेश आहे.
छाप्यात पोलिसांनी १६,६८० रुपये रोख आणि अंदाजे ६०,००० रुपये किमतीचे ५ मोबाईल जप्त केले.तपास सहाय्यक फौजदार राजू वरक आणि रावसाहेब कसेकर करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







