ICHMH51NEWS.IN
9921600800

आयडीबीआय बॅंकेच्या सीएसआर निधीतून इचलकरंजी महानगरपालिकेस आरओ वॉटर फिल्टर–कुलर भेट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आयडीबीआय बॅंकेच्या सीएसआर निधीतून इचलकरंजी महानगरपालिकेस आरओ वॉटर फिल्टर–कुलर भेट

इचलकरंजी

नागरिकांच्या सोयीसाठी आयडीबीआय बॅंकेच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून इचलकरंजी महानगरपालिकेस आरओ वॉटर फिल्टर आणि वॉटर कुलर भेट देण्यात आले. श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात प्रति तास ९०० लिटर क्षमतेचा आरओ वॉटर फिल्टर आणि १२० लिटर क्षमतेचे ब्लू स्टार कंपनीचे दोन वॉटर कुलर बसविण्यात आले आहेत.

Advt

या वॉटर फिल्टरचे पूजन आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, आयडीबीआय बॅंकेचे व्यवस्थापक अजित धायगुडे, नाट्यगृह व्यवस्थापक सुर्यकांत पाटील, शिवाजी कांबळे, आकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

आयडीबीआय बँकेकडून महापालिकेस वॉटर कुलर व आर ओ मशीन देण्यात आले

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा