ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत “जागतिक बेघर निवारा दिन” उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत “जागतिक बेघर निवारा दिन” उत्साहात साजरा

इचलकरंजी:

इचलकरंजी महानगरपालिका संचलित आधार शहरी बेघर निवारा केंद्रात “जागतिक बेघर निवारा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत पंचवटी चित्रमंदिराजवळील पालिका संकुलात असलेल्या या निवारा केंद्रात सध्या २५ महिला व पुरुष लाभार्थी वास्तव करीत आहेत.

या निमित्ताने केंद्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिसरात रांगोळी सजावट करण्यात आली होती. लाभार्थ्यांसाठी भजन कार्यक्रम घेण्यात आला असून सर्वजण या कार्यक्रमात तल्लीन झाले. मुख्य कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अब्राहम आवळे उपस्थित होते.

Advt-

स्वागत व प्रास्ताविक समाज विकास अधिकारी सुनील शिंदे यांनी केले. शहर अभियान व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे यांनी निवारा केंद्रात चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. केंद्रातील सर्व लाभार्थ्यांची आधार व आभा कार्ड नोंदणी करण्यात आली असून त्यांची आरोग्य तपासणी व औषधोपचारही करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांना विविध प्रशिक्षण देण्याचे कार्यही सुरू आहे.

कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांच्या हस्ते केक कापून “जागतिक बेघर निवारा दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमास समुदाय संघटक सुरेश कांबळे, सन्मिता निंबाळकर, बेघर निवारा केंद्राच्या संचालक संस्थेचे सदस्य तसेच संवाद सामाजिक मंडळाचे अध्यक्ष संजय खूळ आदी मान्यवर उपस्थित होते.

बेघर निवारा दिन साजरा करताना महापालिका अधिकारी 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा