इचलकरंजी महापालिकेच्या ‘अभय योजने’त ९०% दंड व्याज माफीस मुदतवाढ
इचलकरंजी – इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे कर थकबाकीदारांना दिलासा देणारी ‘अभय योजना’ लागू करण्यात आली असून ९०% शास्ती (दंड/व्याज) सवलतीस मुदतवाढ देण्यात आली आहे. मालमत्ता धारकांना आता ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ही विशेष सवलत मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत ठराविक कालावधीत मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ : ९०% सवलत (मुदतवाढ)१ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२५ : ७५% सवलत,१७ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२५ : ५०% सवलत,१ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२५ : २५% सवलत मिळणार आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील कर संकलन केंद्र तसेच प्रभाग समिती कार्यालयांमध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच नागरिकांना https://ichalkaranjimnp.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी सर्व मालमत्ता धारकांना आवाहन केले आहे की, या मुदतवाढीचा लाभ घेत ठराविक कालावधीत कर भरून सवलतीचा फायदा घ्यावा. वेळेवर कर भरून शहराच्या विकासात आपला वाटा उचलावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







