‘दिपस्तंभ २०२४-२५’ राज्यस्तरीय पुरस्काराने श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था सन्मानित
इचलकरंजी
आर्यचाणक्य नागरी सहकारी पतसंस्था इचलकरंजी यांना दिपस्तंभ पुरस्कार २०२४-२५ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार (MAFCOCS) यांच्या वतीने दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी डेनिसन रिसॉर्ट, कुमटा-गोकर्ण-महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
Advt
सहकारी पतसंस्था क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, पारदर्शक व सुयोग्य व्यवस्थापन तसेच समाजाभिमुख उपक्रमांसाठी ही पतसंस्था ओळखली जाते. आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेला कोल्हापूर-सांगली-सातारा विभागात तृतीय क्रमांकाचा “दिपस्तंभ” पुरस्कार मिळाला आहे.
या सोहळ्यास फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे आणि राज्यातील विविध पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचारीवृंद व सभासदांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
दिपस्तंभ २०२४-२५ पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







