अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम प्रशालेत सफाई कर्मचार्यांचा ’स्वच्छता दूत’ गौरव
इचलकरंजी –
येथील डीकेटीई सोसायटी संचलित अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम या प्रशालेचा ३८ वा वर्धापन दिन आणि महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री जयंतीचे औचित्य साधत स्वच्छतादुत गौरव समारंभ पार पडला. यामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेत कार्यरत १५ सफाई कर्मचार्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात ’स्वच्छता दूत’ म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, प्रभारी सहा.सार्वजनिक आरोग्याधिकारी मंगेश दुरुगकर, मुख्य स्वच्छता निरिक्षक रफिक पेंढारी, प्रभारी अधिकारी तनवीर आगा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रवेशावेळी प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सर्व स्वच्छतादूत व मान्यवरांचे फुलांचा वर्षाव करत अनोख्या पध्दतीने स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन झाले. त्यानंतर महानगरपालिकेत कार्यरत १५ महिला व पुरुष सफाई कर्मचार्यांना स्वच्छतादूत म्हणून सन्मानित करण्यात आले. तर विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना स्वच्छतादूतांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

Advt
यावेळी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी, प्रशालेने या अनोख्या समारंभातून समाजासमोर आदर्श ठेवल्याचे सांगत या स्वच्छतादूतांमुळेच शहरात स्वच्छता असल्याचे आवर्जुन सांगितले.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव सौ. सपना आवाडे यांचे प्रोत्साहन लाभले. या अनोख्या उपक्रमाचे नियोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता केटकाळे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. मंगल जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्वच्छतादूत सन्मान करताना अनंतराव भिडे विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुनीता केटकाळे, डॉ सुनीलदत्त संगेवार, मंगेश दुरुगकर व रफिक पेंढारी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800