ICHMH51NEWS.IN
9921600800

आचार्यश्री आनंद युवा मंचतर्फे २०० होमगार्डसना दिवाळी साहित्य वाटप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आचार्यश्री आनंद युवा मंचतर्फे २०० होमगार्डसना दिवाळी साहित्य वाटप


इचलकरंजी –

सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या आचार्यश्री आनंद युवा मंच, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ व भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ यांच्या वतीने २०० होमगार्डसना दिवाळी साहित्य भेट देण्यात आली. दिवाळी सर्वांनाच आनंदाची जावी या उद्देशाने पोलिस दलाचा घटक असलेल्या होमगार्डसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रितम बोरा व राकेश बंब यांच्या मार्गदर्शनाखाली मोती साबण, सुवासिक तेल, दिवे, उटणे आदी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास मंचचे मार्गदर्शक दिलीप मुथा प्रमुख उपस्थित होते. मयूर पिपाडा, सुमित मुनोत, दिनेश चोपडा, सुनील बोरा व आरव मुनोत यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. यावेळी गावभाग पोलीस स्टेशन इचलकरंजीचे प्रमुख इन्चार्ज प्रमोद कांबळे उपस्थित होते.

Advt

दिलीप मुथा यांनी सांगितले की, “होमगार्ड हे नेहमीच बंदोबस्तात आघाडीवर असतात. त्यांच्या सेवेला प्रतिसाद म्हणून आम्ही छोटा प्रयत्न केला आहे.” यावेळी उपस्थित होमगार्डनी मंचच्या आनंदगुरू मोफत चपाती भाजी सेवा केंद्र याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बंदोबस्तादरम्यान या सेवेचा मोठा आधार मिळतो, असे त्यांनी सांगितले.

होमगार्डना दिवाळी साहित्य वाटप करताना आचार्यश्री आनंद युवा मंचचे सदस्य

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा