ICHMH51NEWS.IN
9921600800

शिवाजीनगर पोलिसांची दुहेरी जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवाजीनगर पोलिसांची दुहेरी जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी छापा टाकत दोन जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ११ आरोपींना अटक करून सुमारे  ३ लाख २२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिली कारवाई भोनेमाळ, खंडेलवाल बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर करण्यात आली. येथे आरोपी तौसिफ रशिद मुल्ला,अतुल चंद्रकांत पेटकर,संकेत उमेश म्हेत्रे,केतन किरण घोरपडे,वरुण जगदिश जगवानी,प्रकाश रविंद्र हुंडेकरी,खंडेलवाल यांना पत्त्यांच्या पानांवर पैसे लावून तीन पानांचा जुगार खेळत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले.या ठिकाणाहून एकूण  १,७२,३८० रुपये किंमतीचा मुद्देमाल, त्यात रोकड, मोबाईल हॅण्डसेट, डीव्हीआर, खुर्च्या, टेबल आदी साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सहा. फौजदार कसेकर करत आहेत.

दुसरी कारवाई जॅकवेल रोड, शेळके मळा येथील कंपाऊंड गेटमधील रुम नं. ३ येथे करण्यात आली. येथे आरोपी विश्वनाथ लवटेयाने स्वतःच्या मालकीच्या जागेत अक्षय पाटील,कबीर खुदबुददीन मोमीन,शरद किशोर पाटील,संतोष हासुरे,तौफिक शेख यांच्यासह जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणाहून रु. १,५०,३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल, त्यात रोकड, मोबाईल फोन, दोनचाकी वाहने, टेबल, खुर्च्या आदी साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. चव्हाण करत आहेत.

दोन्ही कारवायांत मिळून एकूण ११ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे रु. ३,२२,६८० इतकी आहे.
ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. पवन गुरख, पो.कॉ. सद्दाम गजबर, पो.हे.कॉ. सूर्यवंशी, तपासी अधिकारी कसेकर व चव्हाण यांच्या पथकाने केली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा