इचलकरंजीत आज पाणीउपसा बंद —पाणीपुरवठा विस्कळीत नागरिकांनी पाणीसाठा जपून वापरावा : महापालिकेचे आवाहन
इचलकरंजी:
कुरुंदवाड विद्युत उपकेंद्रावरील दुरुस्तीचे काम विज वितरण कंपनीतर्फे आज मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे मजरेवाडी जॅकवेल येथील विद्युत पुरवठा बंद राहणार असून, त्यामुळे इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित होणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. दरम्यान, शहरवासीयांनी उपलब्ध पाणीसाठा जपून वापरावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







