इचलकरंजीतील शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासह विविध विकासकामांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
इचलकरंजी : शहरातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत आणणे, पंचगंगा नदी गाळमुक्त करणे तसेच इतर प्रलंबित विकासकामांबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ही बैठक आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून घेण्यात आली असून बैठकीत सर्व विषयांवर सखोल चर्चा झाली.
आमदार आवाडे यांनी पंचगंगा नदीतील गाळ काढण्याची गरज अधोरेखित करत सांगितले की, त्यामुळे महापूराचा धोका कमी होऊन शहरातील नुकसान टाळता येईल. तसेच शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आल्यास नागरिकांना होणारा त्रास व वेळेची नासधूस कमी होईल.
या बैठकीस प्रांताधिकारी दीपक शिंदे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन लवकरच संबंधित कामांना गती मिळणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.
बैठकीत चर्चा करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे व अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







