ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत व्यापाऱ्याच्या घरातून 10 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत व्यापाऱ्याच्या घरातून 10 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला

इचलकरंजी:
शहरातील यशोलक्ष्मी नगर परिसरात व्यापाऱ्याच्या घरातून तब्बल १०लाख ६८ हजार रु किंमतीचे सोन्याचे, चांदीचे आणि मोत्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद श्रीनिवास मर्दा (वय ४७, व्यवसाय – कापड व्यापार, रा. यशोलक्ष्मी नगर, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या दरम्यान त्यांच्या घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातील ड्रॉवरमधून अज्ञात चोरट्याने मौल्यवान दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये विविध प्रकारचे सोन्याचे नेकलेस, मंगळसूत्रे, अंगठ्या, नाणी, बेसलेट आणि चांदीची पूजेसाठी ठेवलेली गाय यांचा समावेश असून, एकूण अंदाजे १०,६८,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

फिर्यादी यांच्या पत्नी सौ. पल्लवी मर्दा यांनी प्रथम ही चोरी लक्षात घेतली. घरातील कामगार व काही नातेवाईकांवर प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार कसेकर करत आहेत.
तपासावर पोलीस निरीक्षक गायकवाड यांचे मार्गदर्शन आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा