इचलकरंजीत गुटखा विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई,4,748 किंमतीचा गुटखा-जर्दा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी :
राज्य सरकारच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमावर इचलकरंजी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी सलिम सरदार खलिफा (वय ४३, रा. विकास नगर, इचलकरंजी) या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पोलीस नाईक आदित्य मारुती दुंडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,सोमवारी संध्याका
Advt
छाप्यामध्ये विमल, डायरेक्टर स्पेशल, मुसाफिर, स्टार, M4 जाफराणी, महक चैनी, V-1 आदी ब्रँडच्या पान मसाल्यांच्या व तंबाखूच्या पाकिटांसह एकूण 4,748/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत पोलीस नाईक पाटील (अंमलदार) यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुनम माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







