ICHMH51NEWS.IN
9921600800

सरदार पटेल जयंतीनिमित्त इचलकरंजीत ‘एकता दौड’चे आयोजन — नागरिकांना सहभागाचे आवाहन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सरदार पटेल जयंतीनिमित्त इचलकरंजीत ‘एकता दौड’चे आयोजन — नागरिकांना सहभागाचे आवाहन

इचलकरंजी : प्रतिनिधी
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त इचलकरंजी शहर पोलीस दल तर्फे ‘एकता दौड (Run for Unity)’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advt

ही दौड दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता पार पडणार असून, दौडीचा मार्ग शिवतीर्थ–मलाबादे चौक–गांधी चौक–राजवाडा चौक व परत शिवतीर्थ असा निश्चित करण्यात आला आहे.

या उपक्रमाचा उद्देश देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्याचा संदेश देणे असा आहे. शहरातील सर्व सामाजिक संघटना, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड (शिवाजीनगर पोलीस ठाणे) यांनी आवाहन केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा