ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी येथे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी येथे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न.

इचलकरंजी
 श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी येथे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे, ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या इचलकरंजी, कापशी, नागठाणे, कडेपूर, मिरज, पेण अशा विविध शाखांमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व १७ वर्षे प्राचार्य पदावर सेवा बजावली. उत्तम प्रशासक, विषयतज्ज्ञ, मितभाषी असणारे प्राचार्य म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून गारगोटी येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. कोल्हापुरात आयटीआय करून वयाच्या १८ व्या वर्षापासून घाटगे पाटील इंडस्ट्रीज येथे दिवसभर काम करून नाईट कॉलेज, कोल्हापूर येथे बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व शिवाजी विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतली. कन्या महाविद्यालय इचलकरंजी येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून १९९१ ला ते रुजू झाले. तसेच आजपर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन करून संस्थेच्या विविध कमिटी मध्ये काम केले.
 याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे अर्थसचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब दुधाळे यांच्या कार्य कौशल्याचा व खडतर जीवन प्रवासाचा आढावा घेतला. तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करणे, शिक्षकांचे गुण ओळखून जबाबदारी देणे, बाह्यविरोधाने विचलित न होता काम करण्याची मानसिकता, विद्यार्थी केंद्र भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. डॉ. दुधाळे सर यांच्या विविध प्रशासकीय कौशल्यांचा उल्लेख केला. याचबरोबर त्यांनी नवोदितांना  डॉ. बापूजींना समजून घेऊन त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून काम करावे असा संदेशही दिला. प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांच्याविषयी प्राचार्य डॉ. रमेश कुंभार, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, प्राचार्य डॉ. शंकर खाडे, डॉ. प्रभा पाटील, डॉ. जालिंदर यादव यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच डॉ. त्रिशला कदम, प्रा. सुधाकर इंडी, डॉ. सुनील गुरव, डॉ. संभाजी निकम, सोनाली बोरगावकर, एकता जाधव यांनी प्राचार्यांच्या विषयी आदरभाव व्यक्त केला.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धीरज शिंदे यांनी केले. यावेळी तासगाव, कडेपूर, इचलकरंजी, मिरज, कोल्हापूर, पेण, नागठाणे, कराड या ठिकाणांहून अनेक गुरुदेव कार्यकर्ते व मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय कर्मचारी वर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा पोतदार व प्रा. स्वाती हाळवणकर यांनी केले तर आभार सुप्रिया पाटील यांनी मानले.

सेवानिवृत्ती निमित्त सत्कार  करताना डॉ मिलिंद हुजरे,प्रा अनिल पाटील,प्रा एस के खाडे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा