ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत ‘रन फॉर युनिटी’ला उस्फूर्त प्रतिसाद — पोलिस दलाच्या उपक्रमात नागरिकांचा मोठा सहभाग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ‘रन फॉर युनिटी’ला उस्फूर्त प्रतिसाद — पोलिस दलाच्या उपक्रमात नागरिकांचा मोठा सहभाग

इचलकरंजी –
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त इचलकरंजी पोलिस दलामार्फत आयोजित “रन फॉर युनिटी” या धाव उपक्रमाला शहरातील नागरिक, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना व स्वयंसेवकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाचा शुभारंभ अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, तसेच शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या या धाव उपक्रमात शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू आणि स्थानिक रहिवाशांनी उत्साहाने सहभाग घेतला. धाव मार्गावर नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची आणि फळपदार्थांची व्यवस्था करून सहभागींचे स्वागत केले.

“रन फॉर युनिटी”च्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमामुळे शहरात ऐक्य, देशप्रेम आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देणारा सकारात्मक माहोल निर्माण झाला.

रन फॉर युनिटी दरम्यान पोलीस व नागरिक

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा