बंद घर फोडून ५२ हजारांचा मुद्देमाल चोरी
इचलकरंजी
जे. के. नगर, कॉलनी, तारदाळ (ता. हातकणंगले) येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने रोकड व सोन्याचे गंठन असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अभिजीत सुरेश रणदिवे (वय ३४, रा. जे. के. नगर, तारदाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याने दिनांक १ नोव्हेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून तिजोरीतील २,०००/- रोकड व ५०,०००/- किंमतीचे सोन्याचे गंठन असा एकूण ५२,०००/- रुपयांचा मुद्देमाल चोरी केला.
दाखल अंमलदार बांगर असून पुढील तपास पोसई कुटे सो. करीत आहेत. शहापूर पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







