घरफोडीच्या उद्देशाने फिरणारा युवक पोलिसांच्या ताब्यात — शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलिसांनी तीनबत्ती चौक परिसरात रात्री साहील अल्लाऊद्दीन कुडचीकर (वय 21, रा. गोसावी गल्ली, इचलकरंजी) याला संशयास्पदरीत्या फिरताना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत काशीनाथ खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सोमवारी रात्री नाष्टा सेंटरच्या मागे संशयास्पदरीत्या थांबलेला आढळला. त्यावेळी तो सूर्यास्तानंतर घरफोडी अथवा चोरी करण्याच्या उद्देशाने थांबला असल्याचे निदर्शनास आले
तपासादरम्यान आरोपीचा पूर्व गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. तो यापूर्वी अशा गुन्ह्यांमध्ये अभिलेखावर आहे.
या कारवाईत पो.हे.कॉ. 591 सुर्यवंशी हे तपास करत असून प्रभारी अधिकारी पो.नि. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







