महानगरपालिकेच्या शालेय कबड्डी स्पर्धेत गंगामाई गर्ल्स व गर्ल्स हायस्कुलचे वर्चस्व
इचलकरंजी –
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेत स्थानिक शाळांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. १४ वर्षाखालील गटात गर्ल्स हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेजने तर १७ व १९ वर्षाखालील गटात गंगामाई गर्ल्स हायस्कुलने विजेतेपद मिळविले. या विजयी संघांची रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
Advt
स्पर्धा डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर संपन्न झाली. या स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात १२, १७ वर्षाखालील गटात १८ तर १९ वर्षाखालील गटात ८ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा शुभारंभ महानगरपालिका क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, शेखर शहा, बी. एस. माने, रफिक मांगुरे, बाळू चव्हाण, वसिम बागवान, ओंकार खानाज, सचिन खोंद्रे, संजय कांबळे, विजय गुख व संजय परी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
सर्व सामने अत्यंत चुरशीचे खेळले गेले. खेळाडूंनी आपल्या संघाच्या विजयासाठी झुंज दिली. १४ वर्षाखालील गटात गर्ल्स हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज प्रथम, ताराबाई गर्ल्स हायस्कुल द्वितीय, तात्यासाहेब मुसळे हायस्कुल तृतीय, १७ वर्षाखालील गटात गंगामाई गर्ल्स हायस्कुल प्रथम, सरस्वती हायस्कुल द्वितीय, ताराबाई गर्ल्स हायस्कुल तृतीय तर १९ वर्षांखालील गटात गंगामाई गर्ल्स हायस्कुल प्रथम, डीकेटीई मराठी मीडियम ज्युनिअर कॉलेज द्वितीय आणि ताराबाई गर्ल्स हायस्कुल तृतीय क्रमांकावर राहिले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







