ICHMH51NEWS.IN
9921600800

तारदाळ येथे गांजा विक्री प्रकरणी महिला अटकेत — शहापूर पोलिसांची कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तारदाळ येथे गांजा विक्री प्रकरणी महिला अटकेत — शहापूर पोलिसांची कारवाई

इचलकरंजी

तारदाळ (ता. हातकणंगले) येथे शहापूर पोलिसांनी छापा टाकून सौ. लक्ष्मी आनंदा गुरव (वय ६०, रा. जी.के. नगर, तारदाळ) हिला गांजा विक्री प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्या ताब्यातून २९० ग्रॅम गांजा ८,१९० रु. असा अमली पदार्थ जप्त केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तुळजाभवानी अपार्टमेंटजवळील मोकळ्या जागेत आरोपी बेकायदेशीररीत्या गांजा विक्रीसाठी ठेवून असल्याचे आढळले. यावरून तिला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात अविनाश मुंगसे, रोहित डावाळे, गडकरी, ढोणे, कुंभार, रुक्कया जत्राटे आदींचा सहभाग होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे या करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा