ICHMH51NEWS.IN
9921600800

लग्न लावून देण्याच्या वादातून मुलाचा आईवर हल्ला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लग्न लावून देण्याच्या वादातून मुलाचा आईवर हल्ला.

इचलकरंजी:
लग्न लावून देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलाने स्वतःच्या आईवर विळतीने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना कोरोची (ता. हातकणंगले) येथे घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुरेखा दादू गेजगे (वय ४५, व्यवसाय गृहिणी, रा. गल्ली नं.१, इंदिरा नगर, कोरोची) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी वैभव दादू गेजगे वय २४ हा त्यांचा मुलगा असून बुधवारी दुपारच्या सुमारास घरातच दोघांमध्ये लग्न लावून देण्याच्या कारणावरून वाद झाला.

वादाच्या भरात आरोपी वैभव याने आईला वाईट शिवीगाळ करून “तुला सोडणार नाही” अशी धमकी दिली आणि घरातील कांदा कापायाच्या लोखंडी विळतीने हल्ला करून उजव्या हाताचे अंगठ्याजवळील बोटाचे एक पेर तोडले. या हल्ल्यात सुरेखा गेजगे गंभीर जखमी झाल्या.

या घटनेनंतर त्यांनी थेट शहापूर पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल कोवळे करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा