राजाराम मैदान एमसीएला देण्याचा निर्णय लोकनियुक्त बॉडी आल्यानंतरच घ्यावा— आयुक्तांना निवेदन
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीच्या राजाराम मैदानाच्या विकासाबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे (एमसीए) भाडेतत्त्वावर देण्याची चर्चा सुरू असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील क्रीडाप्रेमी व स्थानिक खेळाडूंच्या सोबत शशांक बावचकर, सागर चाळके व प्रकाश मोरबाळे यांनी आयुक्तांची भेट घेतली.
या भेटीत त्यांनी मैदान स्थानिक खेळाडूंच्या सरावासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने एमसीएला देण्याचा निर्णय लोकनियुक्त बॉडी आल्यानंतरच घ्यावा, अशी विनंती केली.
या संदर्भात आयुक्तांनी स्पष्ट केले की, महानगरपालिकेकडून एमसीएला मैदान देण्याचा कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही तसेच एमसीएकडूनही कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. लवकरच महानगरपालिकेची लोकनियुक्त बॉडी अस्तित्वात येणार असून, त्या सभागृहासमोरच या विषयावर चर्चा होईल.
आयुक्तांनी पुढे आश्वासन दिले की, स्थानिक खेळाडू व स्पोर्ट्स अकॅडमींच्या हक्काला व सरावाला कोणतीही बाधा येणार नाही, तसेच त्यांच्या हिताचे निर्णयच घेतले जातील.
आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देताना खेळाडू
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







