डी.के.ए.एस.सी. कॉलेजच्या खेळाडूंचे आंतर विभागीय ॲथलेटिक्स व वेटलिफ्टिंग सर्धेत यश
इचलकरंजी
8 ते 10 नोव्हेंबर 2025 दरम्यान द न्यु कॉलेज कोल्हापूर यांच्या विद्यमानाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय मैदानी स्पर्धेत डी.के. ए.एस.सी. कॉलेजच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी करत यश प्राप्त केले आहे. यामध्ये समिक्षा आडसुळे हीने 1.45 मीटर इतकी उंच उडी टाकत सुवर्ण पदकावर शिक्का मोर्तब केला. तर प्रतिक्षा आडसुळे हीने 1.40 मीटर इतकी उंच उडी मारत रजत पदक पटकावले. तसेच हातोडा फेक या प्रकारात सौरभ दंडवते ह्याने 40 मीटर लांब हातोडा फेकत कांस्य पदक पटकावले. तसेच देवचंद कॉलेज, अर्जूननगर यांच्या विद्यमाने संपन्न झालेल्या आंतरविभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत क्रिश मोरे याने 160 किलो स्नॅच आणि 140 किलो क्लिन ॲण्ड जर्क असे एकूण 300 किलो इतके वजन उचलून रजत पदक पटकावले आहे. क्रिश हा युनिक वेटलिफ्टिंग सेंटर मध्ये उत्तम मेंगणे यांच्याकडे प्रशिक्षण घेतो.
या सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. खाडे यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रबंधक आर. बी. जोग उपस्थित होते. शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मुजफ्फर लगीवाले व प्रा. विनायक भोई यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करताना प्रा.खाडे व शिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







