इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल.
इचलकरंजी:
अल्पवयीन मुलीला प्रेमाचे अमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून जवळीक साधलेल्या तरुणाने तिचे अल्पवय माहित असतानाही तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
ही घटना सोमवारी दुपारी सुमारे १२.३० ते सायंकाळी ५.०० वाजेदरम्यान जवाहरनगर परिसरातील आरोपीच्या राहत्या घरात घडली. आरोपीने फोनवर बोलावून अल्पवयीन मुलीला घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत पोक्सो व अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा गेल्या दोन वर्षांपासून पीडित अल्पवयीन मुलीशी फोनवर सतत संपर्कात होता आणि प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. यापूर्वी जून २०२५ मध्ये मुलीने प्रेमप्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला स्पष्ट ताकीद दिली होती, तरीही त्याने पुन्हा संपर्क साधला आणि ही घटना घडली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड हे स्वतः करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







