इचलकरंजी आम आदमी पक्षाकडून मालेगावातील अमानुष घटनेचा तीव्र निषेध
इचलकरंजी
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर खुनाच्या अमानुष घटनेविरोधात इचलकरंजी शहर आम आदमी पार्टीने जोरदार निषेध नोंदवला. शहराध्यक्ष वसंत कोरवी यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयात मा. श्री. संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात संबंधित गुन्हेगाराला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली असून, या भयावह घटनेमुळे समाजात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उमटली आहे. आरोपीवर त्वरीत आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदन देताना शहराध्यक्ष वसंत कोरवी, उपाध्यक्ष रावसो पाटील, सचिव शब्बीर शिरोळे, माजी अध्यक्ष प्रकाश सुतार, बाबुराव कारंडे, संतोष भागवत, अब्दुलमजिद नाईकवाडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नायब तहसिलदार संजय काटकर यांना निवेदन देताना आपचे कार्यकर्ते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







