ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी बार असोसिएशनमध्ये संविधान दिन उत्साहात; न्याय व सामाजिक न्याय समजून घेणे आवश्यक — मा. न्यायाधीश जी. एम. नदाफ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी बार असोसिएशनमध्ये संविधान दिन उत्साहात; न्याय व सामाजिक न्याय समजून घेणे आवश्यक — मा. न्यायाधीश जी. एम. नदाफ

इचलकरंजी : इचलकरंजी बार असोसिएशनतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मार्गदर्शन करताना मा. न्यायाधीश जी. एम. नदाफ यांनी “न्याय आणि सामाजिक न्यायाचा खरा अर्थ प्रत्येक नागरिकाने समजून घेणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करून त्यांनी भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे महत्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीशसो श्री. जे. एल. गांधी होते. त्यांनी संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि ४२व्या घटनादुरुस्तीचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री. पी. एन. रोकडे, न्यायाधीश आर. डी. खराटे, इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात गोवा येथे झालेल्या आर्यन मॅन स्पर्धेत यश मिळवलेल्या अॅड. जीया गफार शेख आणि राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या अॅड. राहुल सामानगडकर यांचा सत्कार मा. जे. एल. गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी
अॅड. राजाराम सुतार (उपाध्यक्ष), अॅड. अभिजित माने (सचिव), अॅड. आदित्य मुदगल (सहसचिव), अॅड. विजय शिंगारे (खजिनदार), अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, कुर्क प्रविणभाऊ फगरे, बापूसाहेब पाटील, अॅड. तेजस आगवणे, अॅड. विनायक चव्हाण, अॅड. अमोल सुतार, अॅड. गौरव पाटील, विधी सेवा समितीचे ज्ञानेश्वर मिरजकर, अभिजित माने, न्यायालयीन कर्मचारी व मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.

प्रास्ताविक अॅड. दिपाली हणबर यांनी केले तर आभार अॅड. संदीप कदम यांनी मानले.

 

फोटो-संविधान दिनी मार्गदर्शन करताना मा. जिल्हा न्यायाधीशसो गांधी साहेब, नदाफ साहेब व अध्यक्ष ॲड. आर आर तोष्णीवाल

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा