ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेत सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार सहायता केंद्रांची निर्मिती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेत सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार सहायता केंद्रांची निर्मिती

इचलकरंजी :

मा. राज्य निवडणूक आयोगाच्या क्रमांक २५ नोव्हेंबर २०२५ च्या प्राप्त आदेशानुसार इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता शहरातील ४ विभागीय कार्यालयांमध्ये मतदार सहायता केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आली आहेत.

या केंद्रांमधून संबंधित प्रभागातील मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधून देणे, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे तसेच दुबार नावे असल्यास त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.मतदार सहायता केंद्रांचे विभाग व प्रभाग :विभाग ‘अ’ – नगरपालिका जुनी इमारत : प्रभाग ८-९-१३-१६.विभाग ‘ब’ – विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक एकवीस : प्रभाग १०-१२-१४-१५,विभाग ‘क’ – सरस्वती हायस्कूल : प्रभाग ४-५-११,विभाग ‘ड’ – शहापूर गाव चावडीमागे : प्रभाग १-२-३-६-७  येथे व्यवस्था केली आहे.

महानगरपालिकेने शहरातील सर्व मतदारांनी आपल्या प्रभागानुसार जवळच्या मतदार सहायता केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा