चांदणी चौकातील पानपट्टीवर मावा विक्री प्रकरणी कारवाई
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील चांदणी चौक परिसरात लाईट पानशॉपवर पोलिसांनी छापा टाकून सुगंधी तंबाखू आणि माव्याच्या पुड्यांचा अवैध साठा जप्त केला. या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी अमर मेघनाथ शिरढोणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी दुपारी साडेबारा वाजता चांदणी चौकातील लाईट पानशॉपवर छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान आरोपी हनिफ युसुफ नदाफ (वय ७०, रा. जवाहर नगर, इचलकरंजी) याच्याकडे सुगंधी तंबाखू, सुपारीचे मिश्रण असलेल्या एकूण ४२ माव्याच्या पुड्या आढळल्या. या सर्व पुड्यांवर कोणतेही लेबल, वैधानिक आरोग्य इशारा किंवा सुरक्षाविषयक माहिती नसल्याने त्या अवैधपणे विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १२६० रुपये असून तपासासाठी एक सॅम्पल पुडी स्वतंत्रपणे घेतल्याची नोंद आहे. ही कारवाई पोलीस दलाच्या तंबाखूविक्रीवरील विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली असून गुन्हा दाखल आणि पुढील तपास ग्रेड पोसई सीमा डोंगरे करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







