ICHMH51NEWS.IN
9921600800

शिवाजीनगर पोलिसांची ४ ठिकाणी धडक कारवाई – गॅस रिफिलिंग व सुगंधी तंबाखू विक्रेते जाळ्यात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवाजीनगर पोलिसांची ४ ठिकाणी धडक कारवाई – गॅस रिफिलिंग व सुगंधी तंबाखू विक्रेते जाळ्यात

इचलकरंजी

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी इचलकरंजी शहरात अवैध गॅस रिफिलिंग, गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करून विक्री तसेच सुगंधी तंबाखू-मावा विक्री करणाऱ्यांवर एकाच दिवशी सलग कारवाई करत चार स्वतंत्र गुन्हे नोंदवले. पहिल्या प्रकरणात महमदअल्ली मलीक शेख (५५, रा. कबनूर) हा कोणताही परवाना नसताना घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस लहान टाक्यांमध्ये भरून विक्री करताना पकडला. त्याच्याकडून ६८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध  जिवनावश्यक वस्तू कायदा कलम ३,७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. दुसऱ्या कारवाईत हेमंत पवार (रा. शहापूर) हा बाळुमामा पान शॉपमध्ये अवैध मावा तयार करून विक्री करताना मिळून त्याच्याकडून १७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. तिसरी कारवाई शिवाजी शंकर बोंगार्डे (रा. जवाहरनगर) याच्यावर झाली असून त्याच्याकडून १७७५ रुपयांचा सुगंधी माव्याचा साठा जप्त करण्यात आला. चौथ्या प्रकरणात अनिकेत बाळासाहेब लोखंडे (रा. कबनूर) हा जयश्री पान शॉपमध्ये मावा विक्री करताना मिळून २३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही प्रकरणांमध्ये टोबॅको ऍक्टनुसार गुन्हे नोंदवले गेले आहेत. कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. आयूब मुजावर, उपनिरीक्षक प्रविण साने, तसेच पथकातील प्रमोद चव्हाण, प्रदिप पाटील, विशाल चौगले यांनी सहभाग नोंदवला. पोलिसांची ही मोहीम शहरातील अवैध गॅस रिफिलिंग व तंबाखू विक्रीवर निर्बंध आणणारी ठरली आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा