ICHMH51NEWS.IN
9921600800

महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावून चोरटा फरार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावून चोरटा फरार

इचलकरंजी :

बावणे गल्ली–साखरपे हॉस्पिटलजवळ आरपी रोड येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून अनोळखी मोटरसायकलस्वार पसार झाला. ही घटना दि. २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४८ वाजता घडली. मनोरमा राहुल पारकर (वय ३९, रा. उजळाईवाडी) या जुपिटरवरून आईकडे जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्याने दीड तोळ्यांची सुमारे १,२०,००० किमतीचे सोन्याची मिनी गंठण हिसकावून सातपुते गल्लीच्या दिशेने पलायन केले. आरोपी वय २५-३० वर्षाचा, मध्यम बांधा, अंगावर जॅकेट असा वर्णन मिळाले आहे. मोटरसायकलचा नंबर समजू शकला नाही. फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पोसई साने करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा