तारदाळमध्ये धाडसी घरफोडी; साडेपाच लाखांच्या सोन्याचे दागिने चोरी
इचलकरंजी
तारदाळ (ता. हातकणंगले) : ज्ञानेश्वरनगर, निमशिरगाव रोड परिसरात दुपारी घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ५,७६,००० किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना १ डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस आली. याबाबत फिर्यादी हरी मारुती चोपडे (वय ४४, रा. ज्ञानेश्वरनगर, तारदाळ) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
दुपारच्या सुमारास राहत्या घराचे कुलूप तोडून तिजोरीतील दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये ३५ ग्रॅमचे गंठण, १४ ग्रॅमचे नेकलेस, विविध वजनांच्या तीन चैन, वेल, झुबे, पिळ्याची व खड्याची अंगठी असा एकूण ९ सोन्या दागिन्यांचा समावेश आहे. चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत ५ लाख ७६ हजार इतकी आहे. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल यादव यांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







