ICHMH51NEWS.IN
9921600800

“कॅफे अड्डा” इचलकरंजीवर पोलिसांची कारवाई; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“कॅफे अड्डा” इचलकरंजीवर पोलिसांची कारवाई; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

इचलकरंजी : झेंडा चौक येथील Cafe Adda ICHALKARANJI या कॅफेमध्ये परवान्याशिवाय व्यवसाय करणे तसेच आतील खोलींमध्ये पडदे लावून अंधार केलेल्या कम्पार्टमेंटमध्ये शाळा–कॉलेजमधील मुला–मुलींना गैरवर्तनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सुमारास निर्भया पथकाकडून करण्यात आली.

Advt

फिर्यादी म.पोहे.कॉ. महादेवी पुजारी (निर्भया पथक, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कॅफेमध्ये कोणताही कॅफे/कॉफी शॉप परवाना प्रदर्शित न करता आरोपींनी प्लायवुडचे गुप्त कम्पार्टमेंट, बाथरूममध्ये बसण्याची छुपी रूम तयार करून गैरप्रकारांना प्रोत्साहन दिले.

या प्रकरणी संकेत शिवपुत्र हुबळे (रा. कोरोची) आणि शैलेश अनिल चंदुरे (रा. शेळके मळा, इचलकरंजी) यांच्यावर इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पो.ना. पाटील करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा