इचलकरंजीतील बेपत्ता सुहास थोरात याचा अपहरण करून खून,मृतदेह मुरगुड हद्दीत सापडला
इचलकरंजी :
मोटरसायकल दुरुस्तीच्या कारणाने घराबाहेर बोलावून नेलेल्या सुहास सतिश थोरात (वय १९, रा. भोनेमाळ, इचलकरंजी) याचा मृतदेह मुरगुड हद्दीतील एका ओढ्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे. अंगावर मारहाण व तीक्ष्ण घावांच्या खुणा आढळल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी सतिश बळीराम थोरात यांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.शुक्रवारी दुपारी चेतक शोरूम परिसरातून आरोपींनी “मोटरसायकल रिपेअर करायची आहे” असा बहाणा करून सुहासला जबरदस्तीने घेऊन गेल्याची तक्रार आहे.
या प्रकरणी ओंकार अमर शिंदे, पृथ्वी चेचर आणि ओंकार कुंभार (रा. लिगाडे मळा, गॅस गोडाऊन परिसर, इचलकरंजी) यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रार दाखल झाल्यानंतर शनिवारी सकाळी महाराष्ट्र कर्नाटक सीमेनजीक मुरगुड परिसरातील ओढ्यात सुहासचा मृतदेह आढळला. गंभीर जखमा पाहता अपहरणानंतर खून झाल्याचा संशय बळावला आहे.
तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्फत सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







