ICHMH51NEWS.IN
9921600800

कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार !

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार !

      कोल्हापूर – समाजात रस्त्यावर अथवा अन्य कुठेही होणारी छेडछाडगुंडांकडून होणारा त्रास यांसह कोणत्याही कठीण प्रसंगांना आत्मविश्वासाने तोंड देण्याचा आणि छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवत युवतींनी रणरागिणी बनवण्याचा निर्धार केलाहिंदु जनजागृती समितीसव्यसाची गुरुकुलम् आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून ७ डिसेंबर या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूलकोल्हापूर येथे शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होतेत्या शिबिरात हा निर्धार व्यक्त करण्यात आलाया शिबिरात कोल्हापूरसातारासांगलीबेळगाव जिल्ह्यातील एक हजारहून अधिक युवतींनी सहभाग नोंदवला.

    या प्रसंगी विविध कठीण प्रसंगांमध्ये युवतीमहिलांनी स्वत:चा बचाव कसा करावायांविषयीची बचावांच्या सोप्या पद्धतीची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आलीतसेच कराटे आणि लाठीकाठी यांचेही प्रशिक्षण देऊन तेही त्यांच्याकडून करवून घेण्यात आलेसव्यसाची गुरुकुलम् मधील प्रशिक्षित वीर आणि वीरांगना यांनी दाखवलेल्या युद्धकालीन प्रात्यक्षिकांमुळे नवचैतन्य निर्माण झालेसहभागी प्रत्येक युवतीला प्रशिस्तपत्रक देण्यात आले.
    या शिबिरात ‘आंतरराष्ट्रीय नेमबाज’ तेजस्विनी सावंत, ‘आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर’ स्नेहांकीता वरुटे, ‘आंतरराष्ट्रीय आर्यनमॅन’ सौमाहेश्वरी सरनोबत,  सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडयेहिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्रीसुनील घनवटसव्यसाची गुरुकुलम्चे प्रधान आचार्य श्रीलखन जाधवउद्योजक श्रीनितीन वाडीकरकोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामधील निर्भया पथकात कार्यरत श्रीबाबासाहेब कोळेकर यांनी उपस्थितांना संबोधित केलेप्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यावर श्रीसुनील घनवटश्रीनितीन वाडीकर आणि श्रीलखन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.

क्षात्रतेजयुक्त आणि युवतींना दिशा देणारे मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन !
 
स्वरक्षण हा आपला अधिकार असून राष्ट्र प्रथम संकल्पनेसाठी कार्य करा – सुनील घनवटहिंदु जनजागृती समिती 

 

 
      स्वसंरक्षणसामर्थ्यस्वाभिमान निर्माण करण्यासाठी यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून याचे आयोजन करण्यात आले आहेया शिबिराच्या माध्यमातून तुमचे सामर्थ्य वाढेलया प्रकारचे शिबिर यापुढील काळात देशभरात आयोजित केले जातीलयुवतींनी यापुढील काळात त्यांच्यावर होणार्‍या आघातांसाठी लढायचे आहेरडायचे नाही याचा ठाम निर्धार करावास्वरक्षण हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार असून राष्ट्र प्रथम या संकल्पनेसाठी कार्य करा.’’
     श्रीलखन जाधव  म्हणाले, ‘‘हे शिबीर महाराणी ताराराणी आणि शक्तीपीठ असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या छत्रछायेखाली होत आहेनवरात्रात ज्याप्रमाणे देवीने राक्षसांचे निर्दालन केले त्याचप्रमाणे आपणही आपल्यातील शक्ती जागृत करून हिंदु राष्ट्रासाठी कार्य केले पाहजेआपल्या हातात जे येईल ते शस्र घेऊनस्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे.’’ श्रीनितीन वाडीकर म्हणाले, ‘‘केवळ शरीर सक्षम असून उपयोग नाहीतर मनही सक्षम असणे आवश्यक आहे त्यासाठी या शिबिराची आवश्यकता आहे.’’
     सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासह भारतात अनेक शूरवीर वीरांगणा होऊन गेल्या आहेतत्यांचा आदर्श आपण नेहमी ठेवला पाहिजेस्वसंरक्षण प्रशिक्षण घेतांना शारीरिकमानसिक आणि आत्मबळाच्या स्तरावरही सक्षम व्हायला हवेत्यासाठी आपल्या कुलदेवतेचा नामजप केला पाहिजे ज्यामुळे आत्मबळ वाढेलयुवतींनी कोणाशीही व्यवहार करतांना सतर्क रहावेआपला मोबाईल नंबर किंवा हॅण्डसेट अनोळखी व्यक्तींना दिला जाणार नाहीयाची काळजी घ्यावीतसेच युवतींनी त्यांच्या पर्समध्ये सुरक्षिततेसाठी मिरची पूडपेपर स्प्रेपण ठेवावा.’’निर्भया पथकाचे पोलीस हवालादार बाबासाहेब कोळेकर म्हणाले, ‘‘आज शिकवलेल्या शिबिरातून जर प्रत्येक युवतीने जर स्वरक्षण केलेतर समाजात घडणार्‍या अपप्रवृत्तींना निश्चित आळा बसेल पोलीस आणि कायदा तुमच्या पाठीशी असून निर्भया पथक २४ तास तुमच्या पाठिशी आहेआज तुम्हाला जे प्रशिक्षण मिळाले आहे ते तुमचे भाग्य आहेअसे प्रशिक्षण प्रत्येक ठिकाणी होणे आवश्यक आहे.’’
      तेजस्वीनी सावंत म्हणाल्या, ‘‘युवतींनो स्वसंरक्षण प्रशिक्षित होऊन स्वत:ला सक्षम बनवास्वरक्षण प्रशिक्षाच्या माध्यमातून युवतींचा आत्मविश्वास वाढतो आणि नवी ओळख निर्माण होतेप्रशििक्षत झाल्यास आपल्याला संकटांतून निभावून जाण्याचे बळ मिळतेआपण कोणत्याही क्षेत्रात असलातरी राष्ट्रासाठीदेशासाठी काहीतरी चांगले कार्य करण्याची उम्मेद ठेवादेशसेवा करता येणे हे अभिमानास्पद आहेत्यामुळे मातृभूमीसाठी जगा.’’ स्नेहांकिता वरूटे म्हणाल्या, ‘‘युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहेसमाजाने ‘स्री’चा सन्मान केला पाहिजेयुवतींनोसमाजातील विघातक प्रवृत्तींपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्याप्रशिक्षण म्हणजे कला नसून तो आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास वाढवणारी व्यवस्था आहे.


शिबिरातातील ठळक घडामोडी
शिबिरस्थळी ठेवण्यात आलेल्या ‘सेल्फी पॉईंट’द्वारे अनेक युवतींनी सेल्फी घेत लढण्याचा निर्धार केला.
यापुढील काळात ‘आम्ही अबला नाहीतर रणरागिणी बनू’अशी प्रतिज्ञा प्रत्येक युवतीने घेतली.
पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या गडकरी सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती देणारे क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले होतेयेथे सव्यासाची गुरुकुलम वतीने ऐतिहासिकदुर्मिळ शिवकालीन शस्रास्रांचे विशेष प्रदर्शन येथे लावण्यात होतेहे प्रदर्शन पाहून अनेकांनी जाज्वल्य इतिहासाचे स्मरण झाले असे सांगितले.
या शिबिरात हुबळी ते कोल्हापूर २३० किलोमीटर अंतर सायकलवरून पार करणारी आणि ‘ गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मिळवणारी कुशौर्या शिंदे हिचा सद् गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.


उपस्थित मान्यवर – भाजपच्या वंदना बंबलवाडवैद्या अश्निनी माळकरपोलीस मित्र अर्चना गुरवउद्योजक श्रीजयंतीलाल पटेलमंदिर महासंघाचे श्रीअशोक गुरवहिंदू जागरणचे धर्मप्रचारक श्रीसनी पेनकरश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्रीसुरेश यादवउद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्रीराजू यादवहिंदु महासभेचे श्रीविकास जाधव आणि श्रीप्रशांत पाटीलश्रीअमर जाधवहिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्रीगजानन तोडकरहिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्रीआनंदराव काशीदमराठा तितुका मेळवावाचे श्रीयोगेश केरकर, ‘इस्कॉन’चे श्री
दीपक खोत 


ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा