गुटखा व पानमसाला तंबाखू साठा प्रकरणी एकावर करावाई
इचलकरंजी:
इचलकरंजीतील स्वामी मळा परिसरात बंदी असलेल्या गुटखा, पान मसाला आणि तंबाखूचा साठा ठेवून विक्रीसाठी तयार ठेवणाऱ्या राजेंद्र विलास तळकर यांच्यावर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे.फिर्यादी सागर जगन्नाथ चौगले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ५ डिसेंबर रोजी दुपारी स्वामी मळ्यातील म्हसोवा गल्ली येथे राहणाऱ्या आरोपी राजेंद्र विलास तळकर (वय ३८) यांच्या घरावर छापा टाकला. छाप्यामध्ये विविध कंपन्यांचा बंदी असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखू असा एकूण ४०,३८० रुपये किंमतीचा साठा मिळून आला.
मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक आणि शासनाने बंदी घातलेल्या पदार्थांचा साठा आरोपीकडे मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. गुटखा–तंबाखूच्या सेवनामुळे हृदयरोग, ओरल सबम्युकस फायब्रोसिस, तोंडाचा, ओठाचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग यांसारखे गंभीर आजार होतात, तसेच तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका वाढतो, हे माहित असूनही आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी असा साठा बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या प्रकरणाचा तपास सपोनि विजय गोडसे करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




