आपटे वाचन मंदिरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न.
इचलकरंजी:
शनिवार दि.०६ डिसेंबर २०२५ रोजी आपटे वाचन मंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हास्तरीय इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या समारंभात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रंथालयाचे ज्येष्ठ संचालक व श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. श्री. श्रीकांत चंगेडिया साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, तर स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे गोविंदराव हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक श्री. अशोक लोले सर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत ग्रंथालयाच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत चंगेडिया यांनी मुलांना बहुमोल मार्गदर्शन केले, तर प्रमुख पाहुणे श्री. अशोक लोले सर यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेची तयारी कशी करावी हे विषद करून त्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून माजी मुख्याध्यापक श्री. प्रताप जाधव व शिक्षिका सौ. प्रज्ञा दातार यांनी काम केले. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे सहकार्यवाह डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी केले. कार्यक्रमास ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्री. काशिनाथ जगदाळे, ग्रंथपाल श्री. आनंदा काजवे व अन्य कर्मचारी , पालक, शिक्षक उपस्थित होते. विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक – चि. उत्कर्ष आप्पासो शेंडगे (सरस्वती हायस्कूल, इचलकरंजी), द्वितीय क्रमांक – कु. स्नेहल सुनील क्षीरसागर (ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूल, नांदणी), तृतीय क्रमांक – चि. शौर्य शिवाजी ठोंबरे (लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर), उत्तेजनार्थ- कु. स्नेहा प्रज्ञेश गुरसाळे (इचलकरंजी हायस्कूल, इचलकरंजी)
पारितोषिक वितरण करताना अशोक लोले सर व सुषमा दातार,सुजित सौदत्तीकर,मोहन पुजारी
श्रीकांत चंगेडिया यांचा सत्कार करताना सौ.सुषमा दातार
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








