इचलकरंजीत फायनान्स कंपनीत २६.५४ लाखांची फसवणूक; सहा जणांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी:
इचलकरंजी पोलीस ठाण्यात इंडसइंड बँक अंतर्गत येणाऱ्या भारत फायनान्सीअल इन्क्लुजन लि. शाखेत तब्बल २६,५४,४४३ रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महेश विराप्पा पाटील (वय २२, रा. जबंगी, ता. आथणी, जि. बेळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला.
फायनान्स कंपनीचे संगम व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे आरोपी सोहेल सलीम जमादार, सुदर्शन आण्णा सुतार, आकार भिमराव यादव, प्रणव दिलीप कांबळे, दिग्वीजय अनिल कांबळे तसेच क्रेडिट मॅनेजर अक्षय विश्वास देवकुळे यांनी एकूण १९१ कर्जदार सदस्यांकडून वसूल केलेले कर्जाचे हप्ते कंपनीमध्ये जमा न करता संगणमताने वैयक्तिक कारणासाठी वापरल्याचे लेखापरीक्षण अहवालातून उघड झाले.
ही फसवणूक १ जानेवारी २०२३ ते ८ एप्रिल २०२५ या कालावधीत महासत्ता चौक, बादशहा पेट्रोलपंपजवळील शाखेत घडल्याचे नमूद आहे. यातील आरोपी ददिग्विजय कांबळे याच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पूर्वीही गुन्हा दाखल असल्याचे आढळले आहे.
गुन्हा दाखल पोसई कांबळे यांच्या मार्फत करण्यात आला असून पुढील तपास पोसई कोळेकर करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







