ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापूर हद्दीत कोयत्याने हल्ला; एक जखमी, गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूर हद्दीत कोयत्याने हल्ला; एक जखमी, गुन्हा दाखल

इचलकरंजी

इचलकरंजी येथील शहापूर पोलीस ठाणे हद्दीत कौटुंबिक वादातून कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत बाबु सदाशिव तावरे (वय ३५, व्यवसाय नोकरी, रा. शिवा चौक, गणेश नगर, इचलकरंजी) हे जखमी झाले आहेत. आरोपी वैभव विजय देसाई (रा. गल्ली नं. ३, गणेश नगर, इचलकरंजी) याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या राहत्या घरासमोर ही घटना घडली. कामासंदर्भात फोन केल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली व त्यानंतर घरातून कोयता आणून फिर्यादी यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस वार केला. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले.

या प्रकरणी दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार मोहिते करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा