ICHMH51NEWS.IN
9921600800

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ‘शिळ्या कडीला नव्याने उत’ — शशांक बावचकर यांचा आरोप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ‘शिळ्या कडीला नव्याने उत’
— शशांक बावचकर यांचा आरोप

इचलकरंजी : छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त माननीय मुख्यमंत्री इचलकरंजी शहरात आले होते. मात्र या दौऱ्यात पुतळ्याच्या लोकार्पणाव्यतिरिक्त शहराच्या दृष्टीने कोणतेही ठोस व भरीव आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे इचलकरंजीकरांची घोर निराशा झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व माजी नगरसेवक शशांक मल्हारराव बावचकर यांनी केला आहे.

बावचकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, खासदारांनी पाणी प्रश्नाचा विषय उपस्थित केल्याने नाईलाजाने मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर बोलावे लागले. वस्तुतः 23 मे 2025 रोजी मुख्यमंत्री इचलकरंजीत 713 कोटी रुपयांच्या कामांच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी शहराचा पाणी प्रश्न तातडीने सोडवण्याचे तसेच इचलकरंजी महानगरपालिकेला प्रलंबित 657 कोटी रुपयांचा जीएसटी निधी त्वरित देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

या घोषणेला साडेसहा महिन्यांचा कालावधी उलटूनही पाणीपुरवठा व जीएसटी निधीबाबत महाराष्ट्र शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे याच विषयांवर पुन्हा एकदा आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी ‘शिळ्या कडीला नव्याने उत’ आणण्याचा कार्यक्रम केला असून शहरवासीयांची फसवणूक झाली असल्याची तीव्र टीका बावचकर यांनी केली आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा