ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक संपन्न.

इचलकरंजी

इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिका क्षेत्रातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त नंदू परळकर यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करून इच्छुक उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती असलेली पुस्तिका महानगरपालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र अचूकपणे भरावे, प्रचारासाठी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिराती तसेच ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्ससाठी समितीकडून पूर्वपरवानगी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच मतदान हेल्प डेस्कची स्थापना करण्यात येणार असून आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींसाठी ७०३०६०३९३९ हा व्हॉट्सॲप क्रमांक व १८००२३३१२१७ हा टोलफ्री क्रमांक जाहीर करण्यात आला.

या बैठकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा शिंगण (ए झोन), बाबासाहेब वाघमोडे (बी झोन), ओमप्रकाश यादव (सी झोन), जयंत उगले (डी झोन), श्रीमती माधुरी परीट (आचारसंहिता कक्ष) तसेच शहरातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राजकीय पक्षाच्या बैठकीदरम्यान घेतलेले छायाचित्र

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा