ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत शिव–शाहू विकास आघाडीच्या इच्छुकांची बैठक संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत शिव–शाहू विकास आघाडीच्या इच्छुकांची बैठक संपन्न.

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिव–शाहू आघाडीच्या उमेदवारी अर्ज भरणे व संबंधित प्रक्रियेबाबत आज एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच कायदेशीर प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या बैठकीस माननीय श्री. शशांक बावचकर, श्री. सागर चाळके, श्री. प्रकाश मोरबळे, श्री. अब्राहम आवळे, श्री. संजय तेलनाडे, श्री. संजय चौगुले, श्री. मालकारी लवटे, श्री. सदा मालबादे यांच्यासह शिव–शाहू आघाडीचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान उमेदवारांनी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी, अर्ज भरण्याची अंतिम प्रक्रिया, तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये स्पष्टता निर्माण झाली असून आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी तयारीला वेग येणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
बैठकीत मनोगत व्यक्त करताना सागर चाळके,यावेळी उपस्थित शशांक बावचकर,मदन कारंडे,संजय चौगुले व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा